शबनम न्युज | औरंगाबाद
राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून शासन तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री अतुल सावे यांनी आज केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुंडलिक नगर, तिरुमला मंगल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी उपसंचालक गणेश दंदे, प्रादेशिक कार्यालयाचे सतिश सुर्यवंशी, औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभिजित आल्टे, कर्नल सतिश ढगे, प्रायार्य डी. एम. पाटील, मार्गदर्शक अनिल जाधव, ॲड राहूल नांवदर याच्यांसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.