शबनम न्युज | पुणे
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
Advertisement
राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झाली. बारावीची परीक्षा सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी, तर दहावीची परीक्षा सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे.