पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जनविकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (४८) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ शुक्रवारी दुपारी १.४५ च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली.
त्याची आई सुलोचना गंगाराम आवारे (६९) यांनी शुक्रवारी रात्री पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला.
सुलोचना यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, श्याम निगडकर, संदिप गरड आणि इतर तिघे जण तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून, भारतीय दंड संहिता आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.