शबनम न्युज | पुणे
पुण्यात आईपीएल वर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आयपीएल मध्ये चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर सट्टा घेणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली. यामध्ये वसीम हनीफ शेख (वय 39, रा. कोंडवा खुर्द) इक्रामा मकसूद मुल्ला (वय 26, रा. घोरपडी पेठ) आणि मुसाबीन मेहमूद बाशाईब (वय 35, रा. सोमवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच जितेश मेहता व अक्षय तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील साईबाबा नगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी काही लोक आयपीएल वर सट्टा घेणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून पाच मोबाईल, लॅपटॉप व एक डायरी असा 1 लाख 80 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वीही आयपीएल 2023 मधील सामन्यांवर सत्ता घेतलेले व केलेले दिसून आले आहे. त्यांच्याबरोबर जितेश मेहता आणि इंदोर येथील अक्षय तिवारी यांच्याशी संगणमत करून हा सर्व प्रकार सुरू होता.