शबनम न्युज | मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किंवा भाजपाच्या विरोधात कुठलाही निकाल गेला की उलट सुलट निर्णय घेतले जातात हा इतिहास आहे. दोन हजारच्या नोटा वितरणातून मागे घेणे हा तसाच निर्णय आहे. या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे, लहरी राजा असेच निर्णय घेणार आहे, हे गृहीत धरून आपण 2024 चा काळ ढकलणार आहोत, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली.
मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांसह १४ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊदेत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कुणालाही येऊदेत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काही म्हणणं नाही. निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे. त्यानंतर दाखवू की जनमत कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाला किती जागा मिळतात? असंही आव्हान संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Advertisement