शबनम न्युज | पुणे
लोणावळ्यात लिफ्ट देण्याच्या बहनाने युवतीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुचाकी गाडीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय युवती शनिवारी रात्री 7:30 सुमारास रायवूड विभागातील ऑक्सिलियम शाळेजवळून घरी जात असताना, मागून दुचाकी गाडीवर आलेला तरुण वैभव साठे याने मी कुरवंडे गावाकडे चाललो आहे, तुला तिकडे सोडतो, असे सांगत तिला दुचाकी वर बसविले, पुढे निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या भट्टी यांच्या बंगल्याच्या जवळ गाडी थांबवत तिच्या एकटेपणाचा फायदा घेत बोलण्याचा लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायला लागल, याप्रकरणी मुलीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैभव साठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.