शबनम न्यूज ; पुणे (दि.२१ जानेवारी) :- मानव मिलन संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली पूज्य गुरु महाराज नेपाल केसरी डॉ मणिभद्र जी यांच्या प्रेरणेने झाली. सेवा चिकित्सा शिक्षण आणि समर्पण या तत्त्वांना घेऊन गेली 24 वर्षे ही संस्था कार्यरत आहे. हे 2022 रजत महोत्सवी वर्ष असून या संस्थेच्या अनेक शाखा भारतात व भारताबाहेर कार्यरत आहे. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेच्या राष्ट्रीय महामंत्री एडवोकेट ललिता प्रकाश ओसवाल आहेत. पुणे दर वर्षी नवीन अध्यक्षांची निवड केली जाते.
यावर्षी 2022 च्या अध्यक्षा म्हणून सौ मीना विजय ओसवाल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ अरुणा कैलास चंद्र बोथरा यांची निवड झाली. या पदाला अनुमोदन सौ ब्रिज बाला श्रीश्रीमाळ डॉक्टर मंजू चोपडा सौ सुषमा मुनोत यांनी दिली. सर्व सभासदांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा रामदेव मंदिर ट्रस्ट, पौड रोड, पुणे 38 येथे संपन्न झाला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव एडवोकेट अभय छाजेड यांची विशेष उपस्थिती होती. या संस्थेने आत्तापर्यंत शंभरावर प्रोजेक्ट केलेले आहेत. यावर्षी सौ मीना विजय ओसवाल यांनी अनाथ अपंग निराधार संस्थेस भेट देऊन अन्नदान तसेच आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला आहे. आपणही या संस्थेस आर्थिक सहाय्य देऊन सर्व कार्यामध्ये मदत देऊ शकता.