शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ फेब्रुवारी) :- भोसरी, चक्रपाणी वसाहतमधील पांडवनगर कॉलनी एकमध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने लोकसहभाग तसेच बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर त्याचे एसीपी सागर कवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पांडवनगर कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदिप पालांडे, शेखर गव्हाणे, प्रतिक शिंदे यांनी पुढाकार घेतला. यावेळी पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस उपनिरीक्षक अशोक केंद्रे तसेच पांडवनगर कॉलनी नंबर एकमधील सर्व नागरिक व महिला उपस्थित होते.
Advertisement