भाजपने या शाळा इमारतीचे श्रेय घेऊ नय
पिंपरी चिंचवड शहरात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न होत आहे या उद्घाटन समारंभात पिंपरी चिंचवड शहरातीलच नेहरूनगर मधील महानगरपालिकेची शाळा आहे या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे परंतु या नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकामाचे श्रेय भाजप घेत असल्याचा आरोप या प्रभागातील राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांनी केला आहे या शाळेची जुनी इमारत धोकादायक झाली होती शाळेतील मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांनी पाठपुरावा केला तसेच नवीन इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध केला व नवीन सुंदर शाळा इमारत उभी केली राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, डॉक्टर सौ वैशाली घोडेकर , गीता मंचरकर या चारही नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करून या नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण केले याचे श्रेय आज आत्ता भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात येत आहे व आम्ही केलेल्या वचनाची पूर्ती करत आहोत असा आशयाचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करत आहेत असा आरोप या चारही नगरसेवकांनी केला आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
या नेहरूनगर येथील नवीन शाळेची इमारत बांधकाम ही फक्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठपुरामुळेच पूर्ण झाली आहे असेही या चारही नगरसेवकांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे तरी भाजपने या शाळेच्या इमारतीचे श्रेय घेऊ नये असेही या नगरसेवकांनी नमूद केले आहे.