शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी.
शहरातील भाजप माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण मंडळ सभापती मनिषाताई प्रमोद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
मनीषा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त , मोरू बारणे क्रीडांगण थेरगाव येथे अभिष्टचिंतनचा तसेच खास महिलांसाठी होम मिनिस्टर व गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

याप्रसंगी शंकर शेठ जगताप , प्रचार प्रमुख चिंचवड विधानसभा भाजप , काळूराम शेठ बारणे , पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष भाजप , माजी नगरसेवक अभिषेक बारणे , माजी नगरसेविका झामाताई बारणे , उज्वला ताई गावडे पिंपरी चिंचवड भाजपा महिला अध्यक्ष, संदीप गाडे स्वीकृत सदस्य ग प्रभाग, विभीषण चौधरी स्वीकृत सदस्य , युवा नेते तानाजी बारणे , युवा नेते निलेश ( महाराज ) दळवी ,युवा नेते प्रमोद पवार , करिष्मा ताई बारणे रवी भिलारे , हनुमंत बारणे , सनी बारणे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमचे सुत्र संचालन होम मिनिस्टर फेम रमेश दादा परळीकर यांनी केले तसेच प्रसिद्ध कलावंत गौतमी पाटील यांनी खास महिलांसाठी कार्यक्रमाची आखणी केल्या बद्दल आभार मानून मनीषा ताई ना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी थेरगाव परिसरातील अडीच हजार महिलां उपस्थित होत्या व जवळपास 5 हजार नागरिकांनी कार्यक्रमा चा आनंद घेतला या होम मिनिस्टर कार्यक्रमा मध्ये प्रथम क्रमांक कविता साळवी फ्रिज व पैठणी सुवर्णा जाधव व सकिना आगलाद यांना सोन्याची नथ व पैठणी तसेच चतुर्थ क्रमांक साठी सोनाली स्वामी यांना मिक्सर व पैठणी देण्यात आली तसेच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या वंदना यादव , उर्मिला अरसुले , अंजना ओव्हाळ, संगीता वाघ , सुनीता काळे , मनीषा कलगावकर वृषाली सुरवसे संध्या वाघमारे शोभा मुळे आदी महिलांना भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन हे शिवछत्रपती शिवाजी मंडळ थेरगाव यांच्या वतीने करण्यातआले होते
मंडप व्यवस्था पोपट कचरे व सिद्धू अवसरे ब्रम्हा लाइट्स यांनी पहिली मंडळाच्या वतीने विनोद पवार , दिगंबर पवार , शंकर खांडगे , सनी डोळस , संभाजी अरसुले , सुमित बनसोडे , सागर वाघमारे, राहुल सोनार , आकाश शेलार , राहुल आखाडे , रोहिदास भालेराव राजू भंडारे प्रज्वल साबळे शाम केदारी मनोज चव्हाण व मंडळाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम पाहिले तसेच महिलांच्या वतीने रत्नमाला देवमाणे , गुन्न्नर सय्यद मंजू गुप्ता , मनिषा ताई गायकवाड , सुनीता ताई कांबळे , रेखाताई जगताप जम्मो शेख , अलका अडागळे कांताबाई यादव यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रमा त कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली