शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीची कामकाज गुरुवार (दि. २९) रोजी सकाळपासून करण्यात येणार आहे. या काळात एमआयडीसी कडून शहराच्या विविध भागात होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे, अशी माहिती एमआयडीसीच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. ३०) रोजी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड,भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर ॲड डी-दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisement