शबनम न्युज | पुणे
एक्सप्रेस वेवर आज अचानक भयानक घटना घडली. खंडाळा घाटात एका टँकरला भीषण आग लागल्याने त्याच्यासोबत पुलाखालील गाड्यांनाही आग लागली असून आगीचे लोळ लांबूनही दिसत आहे. पुलाखालील दोन तीन कार आगीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये अनेक जण जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या ठिकाणी ॲम्बुलन्स पोहोचले आहे. तसेच चार ते पाच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचल्या आहेत. परंतु आग मोठी असल्याने मदत कार्य करण्यात अडथळे येत आहेत. गेल्या तासभरापासून ही आग पेटलेली असून दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली आहे.
Advertisement