शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (15 जून) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.16 जून) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.