शबनम न्युज | पुणे
ठाकरे गटाचे युवा सेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश याग करण्यात आला. तर यावेळी 33 किलोच्या मोदकचा प्रसाद गणपती बाप्पा उपनेते आणि सभापती नीलम गोरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवराज पारिक यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement
यावेळी बोलताना नीलम गोरे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही संकल्प आणि उपक्रम आहेत. त्या सर्वांना गणपती बाप्पाने यश देवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.