शबनम न्युज | पिंपरी
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी एका महिलेवर अत्याचार केला असल्याची घटना चिखली भागात घडली. या प्रकरणी शशिकांत कदम, रमेश गोपीनाथ सुरवसे (दोघे रा. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी कदम याने कायमस्वरूपी काम देण्याच्या बहाण्याने फिर्यादीची ओळख वाढविली. मोबाईल नंबर घेऊन वारंवार संपर्क साधला. व्हिडिओ कॉल केले, कॉल रेकॉर्ड केले, रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. व्हिडिओचा फायदा घेत त्याचा मित्र आरोपी रमेश यांनीही अत्याचार केले. आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
Advertisement