शबनम न्यूज | पिंपरी
सराईत गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
विघ्नेश गुणशिलंग रंगम (वय २४, रा. पिंपळे गुरव पुणे), अक्षय राजेश खडे (वय २५, रा. पंचशील चौक मुंजांबा वस्ती धानोरी पुणे) नागेश मलप्पा कांबळे (वय २०, रा. मोजे शाळेचे समोर मुजांबा वस्ती धानोरी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल स्त्रीगर गार्ड मॅक्झिन असलेले पिस्तूल व दोन जिवंत राऊंड मिळून आले आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याचे काही पोलिस अधिकारी सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली असता, ६० फुटी रोड पिंपळे गुळव येथे एका काळ्या रंगाच्या पॅशन मोटरसायकल वरून तीन इसम पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपींना ताब्यात घेतले. तपासा दरम्यान आरोपी हे स्वतःकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत पितळी राऊंड कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैद्रता बाळगले असून, त्यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ सह 135 सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ गुन्हे विभागातील पोलीस निरीक्षक सुनील तांबे तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एमडी वरुडे यांच्या पथकाने केली.