शबनम न्यूज | रावेत
रावेत परिसरातील किवळे मुकाई चौकाजवळ दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी निर्माण माईन स्टोन, साइडवरील बेसमेंट मधील पत्राचे रूममध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी फरार झाले होते. तपासादरम्यान मित्रानेच एक आपल्या मित्राचे खून केल्याचे समोर आले होते. आरोपी फरार असल्याने रावेत पोलीस यांचा शोध सुरू होता. आज मात्र सदर घटनेतील आरोपीला जेरबंद करण्यात रावेत पोलिसांना यश आले आहे.
दिनेश रामविलास यादव (वय २१, रा. निर्माण स्टोन, साइटवरील बेसमेंट मधील पत्राच्या रूममध्ये मुंबई पुणे हायवे जवळ रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनेशने त्याचा मित्र गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरून तोंडावर सिमेंटची वीट ३ ते ४ वेळा मारून हत्या केली होती.
पोलिसांनी दिला माहितीनुसार, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, दिनेश यादव हा गुन्हा केल्यानंतर निघून गेलेल्या मार्गाची सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असता, आरोपी हा सेंट्रल चौक देहूरोड येथून एका टेम्पोमध्ये बसून मुंबई बाजूकडे गेल्याची दिसून आले. त्यानंतर आरोपीचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता, ७ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांना माहिती मिळाली असता, सदर आरोपी शिवाजी चौक, कल्याण येथे असल्याची माहिती मिळाली. माहिती प्राप्त होताच रावेस पोलीस ठाण्याचे तपास पथक कल्याण येथे रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपी शिताफीने पकडून रावेत पोलीस ठाण्यात आणले.
सदाची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे सह पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त परदेशी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलगार विशाल जाधव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे गायकवाड नंदलाल राऊत रमेश तांबे संतोष तांबे विजयकुमार वाकडे रमेश ब्राह्मण संतोष धावरे व मग पुन्हा धाकडे यांनी केली