शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:
पिंपरी चिंचवड शहरातील विकास नगर किवळे भागात चौधरी सुपर मार्केट या दुकानावर काही दिवसापूर्वी चोरट्यांनी हल्ला केला तीन कोयता घेऊन सदर चोरटे सुपर मार्केटमध्ये घुसले व त्यांनी तोडफोड करून पैशाच्या गल्ला लूटला त्यांना प्रतिकार करताना दुकानाचे मालक चौधरी बंधूवर चोरट्यांनी कोयत्याने वार केले या घटनेनंतर विकास नगर किवळे परिसरातील दुकानदारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले सध्या विकास नगर परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे हा भाग दाट लोकवस्तीचा झाला आहे या विकास नगर पिवळे परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी तसेच या हल्ला करणाऱ्या चोरट्यांना पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विकास नगर किवळे परिसरातील व्यापारी संघटनेच्या वतीने शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस तसेच गणेश चव्हाण, संजय बंसल ,धर्मपाल तंतरपाळे ,यांनी देहू रोड पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विकास नगर परिसरामध्ये दुचाकी वाहनावर लहान मुले ट्रिपल सीट फिरतात वेगाने गाण्यात चालवतात सर्वसाधारण लोकांना त्रास देतात या परिसराची परिस्थिती बिघडत चालली आहे पोलिसांचा धाक राहिलेला नाही पूर्वी ग्रामीण मध्ये असताना हा मोठा भाग व अत्यंत कमी कर्मचारी असताना रात्रीचा राउंड व्हायचा पण आता तो राऊंड होत नाही विकास नगर परिसरामध्ये पोलिसांनी लक्ष द्यावे व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व नागरिकांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.