शबनम न्यूज: पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारचे नऊ वर्ष पूर्ण केले या निमित्ताने भारतीय जनता पार्टी वतीने मोदी@9 जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मतदान नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणकर व राष्ट्रीय सरचिटणीस गौरव गौतम यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे ,माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे ,यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे अनुप मोरे, संकेत चोंधे गणेश वर्पे ,सुशील मेंगडे ,अजय दूधभाते, अजित कुलते यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा आढावा देत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाची वाढलेली प्रतिष्ठा या सर्वांचा दाखला देत युवकांमध्ये मतदार नाव नोंदणीचे नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य या अभियानांतर्गत होणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी दिलीप तनपुरे,.सुर्यकांत गोफणे ,संतोष ढोरे, प्रमोद ठाकर,कृष्णा भंडलकर., गणेश काची,धनंजय ढोरे,.बंडोपंत शेळके,.मनोजकुमार मारकड,.ॠतिक काची,कृष्णराव गिरगुणे,बाळासाहेब सोनवणे,.मनोज प्रधान,.बळीराम घोडके,रमेश गाढवे,भास्कर गाडेकर,.भुषण शिंदे,शैलेश जाधव,सुरज पवार,.. इत्यादी युवकांनी सहभाग घेतला व सदर मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत