रहाटणीत भाजपा युवा वॉरियर्स नामफलकाचे उद्घाटन
पिंपरी, पुणे (दि.१६ जून २०२३) देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील नऊ वर्षात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असे निर्णय घेतले आहेत. त्याचे दृश्य परिणाम आता दिसत आहेत. आता युवक, शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य नागरिक भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रामध्ये येईल, तसेच महाराष्ट्रातही भाजपा शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे शिवसेना) युतीच पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नऊ वर्ष पूर्ण केले असून त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी@9 या कार्यक्रमाचे देशाभरात आयोजन केले आहे. यामाध्यमातून मोदी सरकारने युवक, महिला, शेतकरी, कामगार, उद्योजक, सर्वसामान्य कष्टकरी यांच्यासाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला दिली जाते. तसेच युवकांना भाजपा बरोबर जोडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर युवा मोर्चाच्या वतीने शहरातील विविध भागात कार्यक्रम घेतले जात आहेत. रहाटणी येथे बुधवारी (दि. १४) युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर्स नामफलकाचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय सचिव गौरव गौतम, प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, मंडल अध्यक्ष
देवीदास तांबे, शहर सरचिटणीस दीपक नागरगोजे, युवा वॉरियर्स शाखाध्यक्ष रुपेश तांबे, प्रणव आभाळे, मयूर शिनगारे आदी उपस्थित होते.
लोणीकर म्हणाले, स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांच्यानंतर
आमदार महेशदादा लांडगे यांनी शहरात भाजपचे मजबूत संघटन उभे केले आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभे बरोबरच आगामी महापालिका निवडणुकीतही चांगले यश मिळेल.
भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी सांगितले की, ३० मे ते ३० जून २०२३ या दरम्यान होणाऱ्या महाजनसंपर्क अभियानात सक्रिय सहभाग घेऊन शहरात सर्वत्र घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. नवमतदार नोंदणी अभियान अंतर्गत ७ जून ते २० जून नवमतदार नोंदणी, प्रति मंडल ५००० पेक्षा अधिक मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात युवा संवाद संमेलन, युवा वॉरिअर्स शाखा उदघाटन, लाभार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी “मन कि बात” कार्यक्रमामध्ये उल्लेख केलेल्या आपल्या जिल्ह्यातील विशेष व्यक्तींची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १० ते २० जून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ जून रोजी विदयार्थी विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या समाज उपयोगी निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा काम करीत आहे.
स्वागत, प्रास्ताविक करताना देवीदास तांबे म्हणाले, भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमास युवकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शहरातील युवा संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. मनपा मध्ये पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी युवा वॉरियर्स काम करीत आहेत असे तांबे यांनी सांगितले.