शबनम न्यूज : पुणे , प्रतिनिधी
मुस्लिम धर्मीयांचा सण बकरी ईद व आषाढी एकादशी हा सण 29 जून रोजी एकत्र येत आहे. या सणांच्या दिवशी पुणे शहरात पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा या सणाच्या दिवशी पाण्याची टंचाई नागरिकांना भासू देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस शेरअली शेख यांनी पुणे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
दिलेले निवेदनात शेरअली शेख यांनी नमूद केले आहे की सध्या पुणे शहरात पाण्याची परिस्थिती पाहता पुणे महानगरपालिका मार्फत पाणी कपात म्हणून दर गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु या 29 जून रोजी गुरुवारी मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद व आषाढी एकादशी हे महत्त्वाचे सण असल्याकारणाने नागरिकांना पाण्याची टंचाई भासू देऊ नये पाणीपुरवठा त्या दिवशी सुरळीत ठेवावा म्हणजे नागरिकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे