शबनम न्यूज | मुंबई
आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोर धरला आहे. तसेच यावेळी समुद्रकिनाऱ्यावर 4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बुधवारी या महिन्यातील सर्वात मोठी भरती येणार असून, या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळल्यानंतर उसळणाऱ्या सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा आणि त्याचवेळी कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे नैसर्गिक पद्धतीने पाण्याचा निचरा होत नाही. त्या उलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखलभागात पाणी साचते, मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यातील भरती ओहोटीची वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार समुद्राला सात जुलै पर्यंत दररोज मोठी भरती येणार आहे. बुधवारी सर्वात मोठी भरती येणार आहे यावेळी 4.78 मीटर उंचीच्या लाटा उचलणार आहेत.
Advertisement