शबनम न्युज | मुंबई
“योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त राहण्यासाठी रोज योगा करूया आणि निरोगी राहूया”, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित योगाभ्यासादरम्यान मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी, कर्मचारी योगाभ्यासामध्ये सामील झाले होते.