पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक परिसरातील गुरुकुल सोसायटी येथील रस्त्याचे काम भाजपच्या काही नेते मंडळींनी मोठा गाजावाजा करत सुरू केलं मात्र पूर्ण करू शकले नाही. अर्धवट अवस्थेमध्ये पडलेल्या या कामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या अर्धवट कामामुळे ड्रेनेज लाईन तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे. पाणीपुरवठा करणारी लाईन बऱ्याच ठिकाणी फुटल्याने होणारा अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा, वाया जाणारे पाणी, पाणी साठून होणारा चिखल,पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अखेर या सर्व समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी चे विद्यार्थी सेल चे अध्यक्ष यश साने यांनी पुढाकार घेत तुंबलेल्या ड्रेनेज लाईन व पाण्याची तुटलेली लाईन दुरुस्त करण्या संदर्भात मनपा च्या संबंधित अधिकारी यांना विनंती केली व सादर समस्यां सोडविली यश साने यांच्या या कार्य तत्परते बद्दल परिसरात
सत्ताधारी भाजपच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले पण अखेर या समस्या सोडविण्यासाठी यश साने यांचे प्रयत्न यशस्वी झाले असल्याच्या चर्चा होत आहेत