पुणे प्रतिनिधी
रंगरेझा फिल्म्स निर्मित आणि सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक व विविध डान्स रिऍलिटी शोज मध्ये परीक्षक असलेले टेरेन्स लेविस यांच्या वर चित्रित झालेले ‘धोका’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. २२ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.
या गाण्याच्या प्रमोशन साठी टेरेन्स आणि अभिनेत्री प्रीत आनंद पुण्यात आले होते.
या गाण्याची निर्मिती केली आहे रोहित कुमार यांनी आणि गायक आहेत नकाश अझीझ. या गाण्याचे गीतकार अभिषेक टी असून त्याला संगीतबद्ध केले आहे अमोल-अभिषेक यांनी. नेहमी आपल्या वेगळ्या लुक साठी प्रसिद्ध असलेले टेरेन्स या गाण्यात देखील एका अनोख्या मावलीच्या भूमिकेत दिसून येतात. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स यांनी केले आहे.
या गाण्याच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना टेरेन्स म्हणाले, “आजपर्यंत मी कॅमेराच्या मागून नृत्य दिग्दर्शन करत आलो आहे यावेळी पहिल्यांदाच मला कॅमेरा समोर येऊन डान्स व अभिनय देखील करावा लागला. हे माझ्यासाठी आव्हान होते परंतु मला अशी आव्हाने स्वीकारणे आवडतात. गाण्याचे बोल व संगीत अतिशय सुंदर असून आजच्या पिढीला ते आवडेल असे आहे त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाले यात शंका नाही.”
यागाण्याला केवळ २४ तासात १ मिलियन पेक्षा ह्यूज मिळाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.