शबनम न्युज | मुंबई
आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांना पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. ’12वी फेल’ चित्रपटात ज्यांचा जीवनपट मांडण्यात आला. ते खरे नायक म्हणजेच मनोज शर्मा. 12वी फेल हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर बनविण्यात आला आहे. मनोज शर्मा हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असून, सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात उप महानिरीक्षक (डीआयजी) पदावर कार्य होते. मात्र, त्यांना महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.
केंद्र सरकारने २००३, २००४, २००५ बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनोज शर्मा यांचे नाव आहे. मनोज शर्मा यांनी यासंदर्भातील माहिती देताना ‘एक्स’वर म्हटले, “एसपी’पासून सुरू झालेला प्रवास आज ‘आयजी’ होण्यापर्यंत पोहोचला. या प्रदीर्घ प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.” मनोज शर्मा यांनी याआधी महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर तसेच मुंबईसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे.