पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
छ. संभाजीनगर मनपा प्रमाणे पिंपरी-चिंचवड मनपा मधील कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे ऑडीट करण्याची मागणी हनुमंत लांडगे.प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र (कामगार सेल) यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, कि पिंपरी-चिंचवड मनपात 10 हजारांहून अधिक कामगार कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत मनपाचे अधिकारी आणि बहुतांश लेबर काॅन्ट्रॅक्टर संगमनाने आणि सर्रासपणे कामगार कायदा धाब्यावर बसवुन कंत्राटी कामगार व मनपाची फसवणूक करीत आहेत.
उदाहरणार्थ :- कामगारांना दरमहा वेळेवर न पगार देणे, बंहुताश विभागात तीन तीन महीने पगार न देणे, निर्धारित संख्येपेक्षा कमी कामगारांकडून काम करुन घेणे, कामगारांना नियुक्तीपत्र, ईएसआय, पीएफ, पगार स्लिप, किमान वेतन, वैद्यकीय सुविधा, अपघात विमा, गणवेश, सुरक्षा साधने, ओळखपत्र न देणे, बायोमेट्रिक हजेरीपत्रक न ठेवणे, कत्रांटी कामगारांना दंडात्मक वसुलीसाठी नेमणे (ज्यामुळे आर्थिक भ्रष्टाचारांची शक्यता असते), मनापाच्या कंत्राटी कामगारांकडून अधिकाऱ्याची घरची कामे करुन घेणे,
अशाप्रकारचा गैरप्रकारचा सध्या सुळसुळाट झाला असलेने तो उघडकीस आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे कामकाज व आर्थिक बाबीचे ऑडीट करणेत यावे. कंत्राटी कामगारांचे संविधानिक हित जोपासणे हे मालक या नात्याने महापालिकेचे आद्यकर्तव्य आहे.तरी छ. संभाजीनगर (औरंगाबाद) मनपाच्या धर्तीवर कंत्राटी कामगार व त्यांचे कंत्राटदार यांचे सर्वकष ऑडीट करावे अशी मागणी हनुमंत लांडगे यांनी केली आहे.