पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी भोसरी विभागीय कार्यालय येथे कार्यकारी अभियंता देवकर, उपकार्यकारी अभियंता भोसरी चव्हाण, आकुर्डीचे कवडे, निगडीचे चौधरी तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक . प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुहास गवस यांची बैठक पार पडली या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक परिसरातील एम.आय.डी.सी., भोसरी परिसरातील सर्व ब्लॉक, चिंचवडमधील डी-१, डी–२, डी–३ ब्लॉक, संघवी कंपौंड, परमार कॉम्प्लेक्स, आकुर्डी इंड. इस्टेट, एच. ब्लॉक, एफ २ ब्लॉक, पवना, मोरया कॉम्प्लेक्स, सेक्टर ७ व १०, कुदळवाडी, पवारवस्ती, चिखली, तळवडे, शेलारवस्ती, सोनवणेवस्ती, मोशी टोल नाका परिसर शांतीनगर, गुळवेवस्ती, भगतवस्ती, ताथवडे, किवळे या ठिकाणचे त्रासलेले उद्योजक उपस्थित होते.
उद्योजकांना येणाऱ्या समस्या खालील प्रमाणे. १. फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे. २. फिडर CRIMPING ३. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे. ४. फिडर पिलर मधील HRC, फ्युज वायर व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व खराब झालेले दरवाजे बदलणे. ५. वेगवेगळ्या साईजचे केबल stock मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी २४ तास उपलब्ध करून देणे कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते. ६. केबल नादुरुस्त वाहन ( FOULT FINDING VEHICALS) वेळेवर उपलब्ध करून देणे. ७. फिडरची लांबी कमी करणे व त्यासाठी लागणारे BAY BRAKER व केबल्स उपलब्ध करून बसवून देणे त्यामुळे फिडरवरील विजेचा लोड कमी होऊन तक्रारी कमी होतील. ८. ओव्हर लोड ट्रान्सफॉरमरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्यक तेवढीच ठेवणे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉरमर बसविणे. ९. महावितरणच्या पिंपरी चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला DPR कार्यान्वित करणे व नवीन DPR साठी पाठपुरावा करणे. १०. सध्या अस्तित्वात असलेली स्विचिंग स्टेशन्स ओव्हर लोड आहेत, त्यांची संख्या वाढविणे. ११. पूर्वी भोसरी विभागाचे भोसरी गावठाण व इंद्रायणीनगर असे दोन सेक्शन होते, त्यातील एक बंद करून भोसरी गावठाण हा एरिया इंद्रायणीनगरला जोडलेला आहे तसे न करता पूर्वीप्रमाणेच दोन सेक्शन करून व दोन असिस्टंट इंजिनिअर देणे,जेणे करून वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविणे सोपे होईल. तसेच मनुष्यबळ डबल करणे. १२. औद्योगिक परिसरातील संबधित विभागातील लाईनमनची संख्या वाढविणे. १३. व्हॉटसप ग्रुपमधील तक्रार MSEDCLच्या अधिकाऱ्यांनी बघून त्या तक्रारीचे त्वरित निराकरण करावे. १४. सर्व वीज वाहिन्यांना AB स्विच व GOD बसविणे व सबस्टेशनमधून परमिट घेण्याचे टाळणेसाठी RMU बसविणे यामुळे परमिट घेणेसाठी जो तास ते दिड तास लागतो व त्याकाळात वीज बंद असते त्यातून सुटका होईल. १५. महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी शटडाऊन घेऊन PREVENTIVE मेंटेनन्सची कामे मार्गी लावणे. १६. थकीत वीज बिलांचे ग्राकाना तात्काळ सुलभ हप्ते करून देणे. १७. ज्या ठिकाणी अंडर ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे शक्य आहे त्या ठिकाणी अंडर ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे. १८.गट नं.६३ आणि ७० ज्योतीबानगर तळवडेचे ट्रान्सफॉरमर प्रपोजल executive officer भोसरीमध्ये मंजुरीसाठी आहे त्याला मंजुरी देणे. . १९. महावितरणच्या पिंपरी व चिंचवड विभागातील खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. या विभागातून सदर तक्रारीकडे दोन दोन दिवस कोणीही लक्ष देत नाही. त्यावर उपाययोजना करणे व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमणे. २०. काही अनोळखी लोकांकडून महावितरणच्या रोहित्र व डी.पी. जवळच टाकाऊ कचरा जाळला जातो त्यावर उपाययोजना करणे. २१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना यांची एक संयुक्त बैठक घेऊन महापालिका रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या केबल्स तोडल्या जातात त्यावर संयुक्तपणे उपाययोजना करणे. २२. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात सहा नवीन सबस्टेशनची उभारणी करावी, त्यापैकी भोसरी MIDC मध्ये -३, कुदळवाडी-१, तळवडे-१ व सेक्टर ७ आणि १० मध्ये -१. यापैकी कुदळवाडी,तळवडे, व सेक्टर ७ आणि १० साठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. महाराष्ट्र राज्यातील वीज वितरण यंत्रणा मजबूत करण्यासाठी ३९ हजार ६०२ कोटीच्या सुधारित वितरण क्षेत्रातील योजनांपैकी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च हा केवळ वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यावर होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होवून ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल असा दावा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केला आहे १४ हजार कोटीच्या निधीतून राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहे. २९२ उपकेंद्राची क्षमता वाढवून त्यामध्ये सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसविली जातील. या शिवाय उच्चदाब वीज वाहिनी भूमिगत टाकण्यात येणार आहे. असे श्री. विजय सिंघल यांनी सांगितले आहे. याचा लाभ भोसरी वीज वितरण विभागाने करून घ्यावा.
तातडीने करावयाची कामे १. पेठ क्रं. ७ व १० साठी ४ BAY BRAKER व त्यासाठी केबल्स देणे व ती INSTALL करून फिडर नं.१ व २ वरील लोड कमी करणे कारण त्यावरून प्रचंड प्रमाणात वीज खंडित होत आहे. त्यामुळे सब स्टेशन मधून वारंवार फिडर बंद करण्यासाठी परमिट घ्यावे लागणार नाही. त्यामुळे एखाद्या FOULT साठी ४० ते ५० मिनिटाचे २ वेळा म्हणजे ८० ते १०० मिनिटे POWER बंद राहणार नाही. २. कुदळवाडी चिखली औद्योगिक परिसर सध्या मोई फिडरवर असून तो टाटा फिडरला जोडून देण्यात यावा. कारण मोई फिडर हा ग्रामीण विभागात येतो तसेच या फिडरवर दगडी क्रशर मशिन जास्त असल्यामुळे या फिडरवर वीज खंडित होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. ३. भोसरी उपविभाग क्रमांक २ चे विभाजन करून इंद्रायणीनगर शाखा कार्यालय व भोसरीगाव असे दोन विभाग करावेत. यामध्ये वीज वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, फिडर क्रीपिंग, वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे,फिडर पिलर मधील आतील खराब पार्ट बदलणे, वेगवेगळ्या साईजचे केबल्स २४ तास उपलब्ध करणे, नादुरुस्त केबल्स FAULT शोधणारे वाहन उपलब्ध करणे,वीज वाहिन्यांची लांबी कमी करणे, बाय ब्रेकर उपलब्ध करणे, अतिभार असलेल्या रोहीत्रावरचा भार कमी करणे, व त्यातील OIL पातळी मेंटेन करणे, DPR कार्यान्वित करणे, भोसरी विभागाचे विभाजन करून इंद्रायणी नगर व भोसरी असे दोन विभाग करणे, लाईनमनची संख्या वाढविणे, WHATSUP ग्रुपवरच्या तक्रारीची त्वरित दखल घेणे, AB स्वीच व GOD बसविणे, अंडर ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे, महावितरणच्या रोहीत्राजवळ कचरा न जाळणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका रस्ते दुरुस्त करताना वीज वाहक केबल्सची काळजी घेणे, सब स्टेशन उभारणे,इ. विषयावर चर्चा झाली व मा. कार्यकारी अभियंता यांनी त्यांचेवर आजपासून कार्यवाहीला सुरुवात करून त्वरित उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले