पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
.पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २१ व पिंपरी परिसर मधील विद्यार्थ्यांसाठी खास बातमी सालाबादप्रमाणे याही वर्षी कार्यक्षम नगरसेवक श्री.संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे युवा मंचच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ व पिंपरी परिसर येथील इयत्ता १० वी १२ वी च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांकरिता लॅपटॉप, टॅब व स्कूल बॅग तसेच इयत्ता ज्युनिअर के.जी. ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्यांचे वाटप सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्षम नगरसेवक श्री.संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजने चा लाभ घेण्या साठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे १) गुणपत्रिका २ ) पालकांचे आधारकार्ड ३) पालकांचे मतदान कार्ड
तसेच या वेळी १० वी १२ वी नंतर काय हा मार्गदर्शनात्मक कार्यक्रम सादर होणार असून या कार्यक्रमात अभिनेते व खासदार डॉ.अमोल कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रम श्री.संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे जनसंपर्क कार्यालय,तपोवन मंदिर रोड, पिंपरी गाव पुणे ४११०१७.येथे सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अशी माहित या कार्यक्रमाचे आयोजकमा.नगरसेवक.संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे यांनी दिली आहे
अधिक माहितीसाठी श्री.अमित कुदळे ९६७३४९४१४९ यांच्याशी संपर्क साधण्याचे हि आवाहन करण्यात आले आहे