पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
.पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांच्या मार्गदर्शना खाली २८ जून राजी उपाध्यक्ष अँड जयश्री विलास कुटे व कार्यकारणीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती,तथा पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती मा.श्रीमती रेवती मोहिते डेरे साहेब यांची मुंबई उच्च न्यायालयात भेट घेतली,
याप्रसंगी बार असोसिएशनच्या माध्यमातून पिंपरी नेहरूनगर न्यायालयात वरिष्ठ न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय स्थापन व्हावे याकरिता निवेदन देण्यात आले,यावर मा.न्यायमूर्ती साहेबांनी पुढील महिन्यात वरिष्ठ न्यायालय स्थापन करून कामकाज त्वरित सुरू करण्यासंदर्भात बार असोसिएशनला आश्वस्त केले ,त्याचबरोबर मोशी येथील प्रस्तावित न्यायासंकुलाचे भूमिपूजन करण्यासंबंधी आढावा घेऊन पुढील महिन्यात भूमिपूजन व्हावे याकरिता सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी *बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड.हर्षद निंबाळकर सर,पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड विलास कुटे, सचिव ॲड गणेश शिंदे, सदस्य ॲड. सौरभ जगताप उपस्थित होते