शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आणि विशेष असते. शिष्याला यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावतो. नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रभागातील मुख्य शाळांमधील गुरुजनांचा सन्मान शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी न्यू इंग्लिश स्कुल बिजलीनगर,मातृ विद्यालय वाल्हेकरवाडी, गुरुमैय्या शाळा चिंचवडे नगर, पिं चिं मनपा शाळा वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा वाल्हेकरवाडी, आदर्श शाळा बळवंतनगरी या शाळांमधील गुरुजनांचा यात समावेश होता. नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व शेखर आण्णा चिंचवडे यांच्या संकल्पनेतून यावेळी सर्व शिक्षकांना छोटीसी भेट म्हणून छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
शिक्षक देखील कोरोना योद्धा आहेत त्यांचा सन्मान यथोचित झालाच पाहिजे कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळात बदलती शिक्षण पद्धती, ऑनलाइन येणाऱ्या अडचणी याला तोंड देत संपूर्ण जग बंद असताना देखील ज्ञानदानाचे पवित्र कार्य समस्त शिक्षक गुरुजनांनी चालूच ठेवले याबद्दल समस्त गुरुजनांना आमचे नमन असे गौरवोउद्गार शेखर चिंचवडे यांनी काढले.
यावेळी लायन्स इंटरनॅशनल चे माजी गव्हर्नर ओमप्रकाश पेठे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले सर, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संचालक सुहास गोडसे, उद्योजक व प्रगतशील शेतकरी आबा पडवळ, भाजपा चिंचवड किवळे मंडलचे उपाध्यक्ष कमलाकर गोसावी, मुख्याध्यापक चारुहास चिंचवडे, मूलकें सर, तिकोने सर, पवळे सर, दहिफळे सर, श्रीधर साईनाथ सर, स्वामी सर आदी मान्यवर उपस्थित होते.