शबनम न्युज | पुणे
लायन्स क्लब ऑफ पुणे चतुःश्रृंगी यांच्या २३व्या पदग्रहण सोहळ्यात मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमात चार मेडिकल ट्रॉली भेट देण्यात आल्या. पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विजय भिसे यांनी या सोहळ्यात प्रेसिडेंट पदाची सूत्रे स्वीकारली. आपल्या पहिल्याच सामाजिक कार्याची सुरुवात श्री भिसे यांनी सहारा वृद्धाश्रमाच्या कार्यापासून केली.
प्रसिद्ध उद्योजक व लायन्स क्लबचे मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन श्री गिरीश मालपाणी यांनी शपथविधी देत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नव्या टीममध्ये श्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली नितीन थोपटे (सेक्रेटरी) महेश खडके (खजिनदार )तर लिओ क्लब मध्ये आणि अनया गायकवाड यांची निवड झाली आहे.
Advertisement