शबनम न्युज | मोशी
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सर्वत्र प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या वतीने कोविड मुक्त प्रभाग अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रभागात लसीकरण मोहीम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम या अभियानांतर्गत करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिश बारणे यांच्या वतीने होत असलेल्या सामाजिक कार्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौतुक केले.
यावेळी संसद रत्न खासदार अमोल दादा कोल्हे, भोसरी विधानसभा प्रथम आमदार विलास शेठ लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, मा नगरसेवक आप्पा बागल ,माजी सभापती शिक्षण मंडळ धनंजय भालेकर , सरपंच हरिभाऊ सस्ते पाटील, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, युवा नेते गणेश सस्ते, प्रशांत सस्ते , कविता ताई आल्हाट , नवनाथ बारणे, राजाभाऊ सस्ते आदी व मोशी परिसरातील नागरिक उपस्थित होते.