अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व आज सर्वांनाच धक्का दिला त्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या वतीने नेत्यांचे वेगवेगळे प्रतिक्रिया येत आहेत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यावर नाराजी व्यक्त केली तसेच या सरकारला माझा पाठिंबा नाही असे स्पष्ट सांगितले जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा नाही असे सांगितले अजित पवार यांच्यासोबत पस्तीस आमदार असल्याचे सांगितले जात आहे अजित पवार यांच्यासोबत आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार यांचे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आपल्या प्रतिक्रिया देताना आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले की राजकारणात अजित पवारांनी मला वेळोवेळी संधी दिली मी कायम त्यांचे सोबत राहिलो आज माझे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आताही जिथे दादा तिथेच मी असणार आहे अशी प्रतिक्रिया देताना अण्णा बनसोडे यांनी आपण अजित दादा सोबतच आहोत असे स्पष्ट केले.
previous post