मी शरद पवार साहेब यांच्या सोबतच असल्याचे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे जाहीर केले आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर जयंत पाटील कोठे आहेत असा प्रश्न पत्रकार परिषदेत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला असता, जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात असून ते आपले नियमित कामकाज करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे आपण शरद पवार साहेब यांच्या सोबतच असल्याचे स्पष्ट केले.
Advertisement