राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल सर्वांना आश्चर्याचा धक्का देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी केलेल्या या राष्ट्रवादीतील बंडाने संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला अजित पवार यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा मोठा गट असल्याचे सांगितले जात आहे अजित पवार यांना एकूण 35 आमदारांचा पाठिंबा आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे पाटील, प्रभाकर वाघेरे , राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे,यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या
Advertisement