शबनम न्यूज वृत्त संस्था :
महाराष्ट्र राज्याच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना साद घातली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी मध्ये येण्यासाठी काँग्रेसची प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे काँग्रेस नेते वेणुगोपाल हे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत असल्याचेही सांगितले जात आहे, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते परंतु आता अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सामील होऊन जो सत्ता संघर्षाचा नाट्यक्रम सुरू केला या पार्श्वभूमीवर काँग्रेस आता प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी मध्ये घेण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे
Advertisement