पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग 18 चिंचवड मध्ये पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाण्याचे तळ्याचे स्वरूप आले त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे. या बाबत प्रशासनाने प्रभागात गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी मधुकर ब्.बच्चेसदस्य:महाराष्ट्र महावितरण समिती सचिव:भाजपा पिं चिं.शहर यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या प्राधिपत्रकात नमूद केले आहे कि स्मार्ट सिटी अतर्गत सुशोभीकरण करता करता अनेक ठिकाणी जनतेच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत पावसाळ्या पूर्वी पाण्याचा निचारा करणे पावसाळी ड्रेनेज साफ करणे या गोष्टी प्रामुख्याने करणे गरजेचे असते पण पहिल्याच पावसात् केशवनगर,तानाजी नगर,लिंक रोड,पेट्रोल पम्प जवळ, दर्शन होल्,..आदी अनेक ठिकाणी अक्षरशः पाण्याची तळी निर्माण झाली होती.
या भागातील समाजिक कार्यकर्ते,नागरिक एकत्र येऊन पाण्याचा निचरा केला तरीही अनेक ठिकाणी अजूनही पाणी जमा आहे त्यामुळे त्या पाण्यात अनेक प्रकारचे किडे निर्माण होऊन रोग राई निर्माण होण्याची श्यक्यता आहे.
विशेषतः शनी मंदिरात अनेक भाविक मोठ्या प्रमानात येतात बरोबर मंदिरासमोरच पाणी साचून दुर्गन्धी सुटली आहे.कानोडे हॉस्पिटल समोरच गेले 10 दिवस पाणी साचून त्यात किडे होऊन मोठी दुर्गन्धी सुटली आहे या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना या पासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच जुने बी एस् एन् एल् ऑफिस च्या जागी शाळेतील मुलाचा क्लास आहे या ठिकाणी सुद्धा कित्येक दिवस पाणी साठून रोगराई पसरली आहे
अश्या अनेक ठिकाणी अडचणी असताना प्रशासणाकडून योग्य दखल घेतली जात् नाही असे जानवते
काही नागरिकांनी समंधित अधिकार्याना या अडचणी सांगूनही काही उपयोग झालेला नाही
वरील सर्व अडचणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित कार्यवाही करावी अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल
मधुकर बच्चे हे स्वतः काल भर पावसात प्रभागात फिरून वरील वस्तुस्थिती पहिली व अनेक ठिकाणी पाणी निचारा करण्यास नागरिकाना मदत केली.
नागरिकाच्या अडचणींना विषशता आरोग्यास प्रशासनाने प्रथम प्राधान्य द्यावे व समंधित अधिकार्यांना कडक सूचना द्याव्या अशी मागणी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव :मधुकर बच्चे यांनी ब प्रभाग क्षत्रीय अधिकारी आमित पंडित यांना निवेदन देऊन वरील वस्तुस्थिती कळविली आहे.
प्रशासनाने प्रभागात गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य द्यावे असेही सुचविले आहे.