पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड मनपातील सर्व कंत्राटी कामगारांना दरमहा पगार स्लिपा देण्याची मागणी हनुमंत लांडगे(सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र – कामगार सेल) यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि पिंपरी-चिंचवड महापालिकेत विविध विभागात 10 हजारापेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करीत आहे. संबंधित लेबर काॅन्ट्रॅक्टर त्यांना पगार स्लिपा देत नसलेने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दिर्घ मुदतीची कर्जे काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. तरी दरमहा सर्व कंत्राटी पगार स्लिप मिळाल्याबाबत पुर्तता अहवाल सादर करणेबाबत संबंधित शाखाप्रमुखांना कळविण्यात यावे. हि मुलभुत मागणी मान्य करावी.