पिंपरी दि.१५ जुलै २०२३:- पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात येत आहे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांमधील विविध संकल्पना समजावून देणारी विविध प्रकारची विज्ञान उपकरणे असलेली विज्ञान वाहिनी बस पिंपरी चिंचवड शहरातील निवडक 40 शाळांमधून जाणार आहे बस बरोबर असलेले तज्ञशिक्षक या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देतील या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन १४ जुलै रोजी विजयकुमार थोरात सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा व प्रवीण तुपे संचालक पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या शुभहस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज महाविद्यालय भोसरी या विद्यालयातून करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब आल्हाट यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील पोटे यांनी केले