वृत्त संस्था प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसंच अजित पवार यांनी राष्ट्रवादी या पक्षावरही दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली असताना आज नाट्यमयरित्या अजित पवार यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतलेले अनेक मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये स्वत: अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या मंत्र्यांचा आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या फुटी नंतर आज प्रथमच राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या फुटीर गटाने अजित पवार यांच्यासह शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली या भेटीनंतरर याविषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले स्पष्टीकरण देताना सांगितले की राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ राहावा तसेच आम्हाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावे अशी आम्ही सर्वांनी शरद पवार यांच्याकडे विनंती केली शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले असे प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले
शरद पवार हे आमचे नेते आहेत आमचे दैवत आहेत आम्ही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली तसेच राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ रहावा अशी आम्ही विनंती केली असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडे सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह त्यांचे सर्व मंत्री पदाधिकारी उपस्थित होते.