शबनम न्यूज प्रतिनिधी :
राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांनी आपला गट वेगळा करत शिंदे फडणवीस सरकार सोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले यानंतर राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडले आहे हे शरद पवार यांचा गट तर आता अजित पवार यांचा दुसरा गट पिंपरी चिंचवड शहरातही राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व त्यांच्या समवेत असलेले नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले असून पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्यासोबत जाणारा गट ही आता निर्माण झाला आहे. याच गटातून पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी समिती शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गट राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही समिती स्थापन करत जाहीर केली आहे, पिंपरी चिंचवड शहराच्या या कार्यकारी समितीमध्ये सुनील गव्हाणे ,इमरान शेख, काशिनाथ जगताप ,प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर, शीलाताई भोंडवे यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच येणाऱ्या काळात हे सर्व समिती सदस्य एकमताने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य करतील असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.