शबनम न्यूज प्रतिनिधी :
पी एम आर डी ने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सेक्टर 12, स्पाईन रोड लगत सदनिकांचे वाटप केले आहे. पण त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अशी नागरिकांची तक्रार आहे या बाबत शिवसेनेचे उपशहर प्रमुख बशीर सुतार यांनी पीएमआरडीए चे आयुक्त श्री महिवाल यांना निवेदन दिले या निवेदनात पी एम आर डी ने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सेक्टर 12, स्पाईन रोड लगत सदनिकांमध्ये असलेल्या त्रुटी त्वरित दूर कराव्यात अशी मागणी केली आहे. बशीर सुतार यांनी स्वतः पी एम आर डी ने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सेक्टर 12, स्पाईन रोड लगत सदनिकांची पाहणी केली या सदनिकांमध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज असल्याचे आढळून आले आहे या कामात .मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला असल्याची शंका उत्पन्न होत आहे तरी सदर कामाची चौकशी करून असलेल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली या वर आयुक्तांनी यावर ताबडतोब कारवाई करून योग्य तो न्याय नागरिकांना देण्याचे मान्य केले आहे. या वेळी निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख मा.बाळासाहेब वाल्हेकर व शिवसेना उपशहर प्रमुख मा.बशीर सुतार उपस्थित होते