मावळ : मावळ तालुक्यातील स्वामी विवेकानंद विकास प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज च्या नियोजन समितीवर बाळासाहेब नामदेव घारे यांची नेमणूक करण्यात आली आहे संस्थेच्या वतीने दिलेल्या नेमणूक पत्रात बाळासाहेब घारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शैक्षणिक संस्थेवर नियोजन समिती सदस्य म्हणून नेमणूक करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद विकास प्रबोधिनी संस्था गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यरत असून संस्थेचे शिवणे मावळ या ठिकाणी स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज आहे या संस्थेत सध्या 115 विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब मुलींच्या शिक्षणाचे ध्येय समोर ठेवून संस्थेचे कॉलेज कार्यरत आहे या नेमणुकीच्या निमित्ताने घारे यांना एकता प्रतिष्ठाणंच्या माध्यमातून सामाजिक ,राजकिय,सहकार क्षेञात काम करण्याबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रातही काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे तसेच बाळासाहेब घारे हे या मिळालेल्या जबाबदारीचे नक्कीच सोने करणार यात शंकाच नाही त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे