पिंपरी : खान्देश मराठा पाटील समाज संघाचा सन २०२२- २३ या वर्षीचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ दि. १६ जुलै २०२३ रोजी चिंचवड येथील चैतन्न सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अधिष्ठाता शीतलकुमार रवंदळे होते. प्रमुख पाहुणे विक्रीकर अधिकारी अनिकेत पाटील, माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, माजी नगरसेवक माउली सुर्यवंशी, उद्योजक दिपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. रवंदळे यांनी विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक क्षेत्र निवडताना घ्यावयाची काळजी व यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे असावे, याविषयावर मार्गदर्शन केले. प्रसंगी, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, कार्याध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, उद्योजक पंकज निकम, मोतीलाल भामरे, संचालक प्रदीप शिरसाठ, देवीदास पाटील यांच्यासह नियोजन मंडळाचे सदस्यांनी पुढाकार घेतला. सुत्रसंचालन शंकर पाटील यांनी केले.