शबनम न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसादिवशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कोणताही सोहळा करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी आज ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आज यासंदर्भातील माहिती देण्यात आली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाही आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाही, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कळकर्णी यांनी कळवले आहे”, असं ट्वीट करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको!
सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन !#SevaDiwas #DevendraFadnavis @Dev_Fadnavis #DevendraFadnavisBday #July pic.twitter.com/6D3Ti6yAjoAdvertisement— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 18, 2023