पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी ;
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, यमुनानगर, साईनाथ नगर, ओटा स्कीम आणि ञिवेणी नगर रस्त्यांचे लवकरात लवकर काँक्रिटीकरण करा करण्याची विनंती शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन द्वारे केलीआहे.
निगडी : पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. अनेक मोठमोठे उद्योग याच भागात आहेत. मात्र, महापालिकेच्या अनेक प्रभागात रस्त्यांचा विकास झाला नाही. या खराब रस्त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांनी थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र लिहून प्रभागातील रस्त्यांचे लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे.
निगडी, यमुनानगर, साईनाथ नगर, ओटा स्कीम आणि ञिवेणी नगर येथील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या भागात रोज शेकडो लोकांची व वाहनाची वर्दळ पाह्याला मिळते. पण खराब रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून या रस्त्यांचे तातडीने काँक्रिटीकरण करण्याची आवश्यकता आहे. अशी मागणी प्रसाद कोलते यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन द्वारे केली आहे