भाजपने केला सव्वाशे पार चा निर्धार
शबनम न्यूज पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादा यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाले एक शरद पवार गट व दुसरा अजितदादा गट.
अजित दादांच्या या बंडामुळे पिंपरी चिंचवड शहरात राजकीय वातावरण बदलले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकेकाळी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड शहरात एक हाती सत्ता होती परंतु 2017 मध्ये स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात भाजपने महानगरपालिका काबीज केली. पिंपरी चिंचवड शहरात सध्या भाजपचे 77 नगरसेवक राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक आहेत.
पिंपरी चिंचवड शहर भाजप पक्षाच्या शहराध्यक्षपदी नुकतीच शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीनंतर शंकर जगताप यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपकी बार सव्वाशे पार असा निर्धार केला आहे म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप 125 जागा जिंकणार आहे जर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहेत तर भाजप 125 जागा जिंकणार असेल तर राष्ट्रवादी काय फक्त तीन जागांसाठी भाजपसोबत आपली युती कायम राखणार आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शंकर जगताप यांनी शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लगेचच भाजपच्या आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी यांची भेटीगाठी सुरू केल्या आहेत नाराज गटाला विश्वासात घेण्याचे काम शंकर जगताप करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात भाजप सोबत युती केल्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची फार मोठी पंचाईत झाली आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केले की शंकर जगताप यांनी सव्वाशेर पार चा निर्धार हा मित्र पक्षांसोबत जिंकण्याचा केलेला आहे परंतु शंकर जगताप यांनी स्पष्ट केले की भाजप ने 2017 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवून शंभर पार चा नारा दिला होता त्यावेळेस एकट्या भाजपने 77 नगरसेवक निवडून आणले होते त्यामुळे आता सव्वाशे पार चा नारा देत भाजप 125 जागा जिंकणार असल्याचे सांगितले आहे.
भाजपच्या या निर्णयाने राष्ट्रवादीची पंचाईत होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या मानाने शहरात कमकुवत पक्ष आहे या पक्षाला ताकद देण्याचे काम शहराध्यक्ष अजित गव्हाणे करीत आहेत परंतु अजित गव्हाणे दरवेळेस पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.
शहरात भाजपसोबत शिंदे गटही आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक शिंदे गटही काही जागा लढविणार आहे. भाजप सोबत शिंदे गट शिवसेना व सोबत राष्ट्रवादी अशी महायुती असल्याने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीला महानगरपालिका एकट्याच्या जीवावर ताब्यात घेणे अशक्य आहे.
महायुतीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसारच राष्ट्रवादीला मिळालेल्या जागेवर उमेदवार देता येणार आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी पक्षाला शहरात कशाप्रकारे ताकद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची कसरत फार मोठ्या प्रमाणात अजित गव्हाणे यांना करावी लागणार आहे.