शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व शिवसेना नगरसेविका मीनल विशाल यादव सदस्य समिती व शिवसेना संघटक विशाल बाळासाहेब यादव यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज कमान – मेहता हॉस्पिटल, मोहन नगर येथे रस्त्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने अंतिम टप्प्यात आलेल्या आहे . या कामांतर्गत बाल ब्रह्मचारी सिदाजी आप्पा चौकामध्ये जुने गाय-वासरू शिल्प हटवून त्या ठिकाणी नवीन गिर गायचे गाय वासरू शिल्प दिवाळीच्या वसुबारस सणाच्या आधी बसविण्यात येणार आहे.
तसेच बालाजी मंदिर चौकामध्ये सुशोभीकरण कारण अंतर्गत मोठी दीपमाळ उभी करण्यात येणार आहे .या कामाला नगरसेविका मीनल यादव यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. नुकतेच मनपा आयुक्त यांनी या कामाला मंजुरी देऊन पुढील काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या शिल्पा मुळे मोहन नगरमध्ये तसेच लिंगायत, गवळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे व सर्व स्तरातून या नवीन शिल्पाचे स्वागत होत आहे.