शबनम न्युज | पुणे
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन जणांच्या टोळक्यांनी एका अल्पवयीन मुलाला कबुतराची विष्ठा खाऊ घातली आहे. पुण्याच्या कात्रज भागात हा अमानुष प्रकार घडला असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गणेश दोडमणी, ओम पंडित, अमोल आदम या तरुणांवर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने आरोपींच्या जागेवरून कबूतर चोरले होते. याचा राग मनात धरून या आरोपींनी मुलाचा शोध घेतले. मुलाचा शोध घेताना कात्रज भागात हत्यारे घेऊन दहशत देखील या टोळक्याने वाजवली केली होती. “कोणी मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकेल,” अशी धमकी देत या तरुणांनी परिसरात हैदोस घातला होता. अल्पवयीन मुलाचा शोध काढल्यानंतर आरोपीने त्याला गाडीत बसवून एका निर्जन ठिकाणी नेले. तसेच तिथे गेल्यावर त्याला तिथे नेऊन कबुतराची विष्ठा खाऊ घातल्याचा संताप जनक प्रकार घडला आहे.